Published Oct 06, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock
स्या 3 गोष्टींसोबत चणे खाऊ नका, जाणून घ्या
अनेकदा लोक निरोगी राहण्यासाठी भाजलेल्या चण्याचे सेवन करतात. भाजलेले चणे कोणी खाणे टाळावे जाणून घ्या
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करावा.
चणे खाताना अनेक गोष्टी टाळल्या पाहिजेत. चणे या गोष्टीसोबत खाणे हानिकारक मानले जाते आणि समस्या वाढू लागतात.
.
काही लोक भाजलेले चणे दह्यासोबत खातात हे करणे टाळावे. या दोघांचे मिश्रण आरोग्यास हानी पोहोचवू शकते.
.
चण्याचे स्वरूप उष्ण आणि दह्याचे स्वरूप थंड असते. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने अतिसार आणि पोटदुखी होऊ शकते.
भाजलेले चणे आंबट फळे जसे संत्री, लिंबू यांच्यासोबत खावू नये. लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ॲसिड असते.
भाजलेले चणे माशांसोबत खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवतात. दोन्हीमध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने असतात जे पचण्यास कठीण असतात.
इन्स्टंट एनर्जी मिळविण्यासाठी तुम्ही भाजलेले चणे गुळासोबत खाऊ शकता. यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते.