www.navarashtra.com

Published Sept 28, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

पितृ पक्षाच्या अमावस्येला करा या वस्तूंचे दान

पितृ पक्षाचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असून पितृ पक्ष अमावास्येला काय दान करावे जाणून घेऊया

पितृ पक्ष

पंचांगानुसार 2 ऑक्टोबर, 2024 रोजी पितृ पक्ष अमावस्या असून या दिवशी दान करणे शुभ मानले जाते

कधी आहे

पितृ पक्ष अमवास्येला दान केल्याने आपले पितर प्रसन्न होतात असा समज आहे, तसंच संकटंही दूर जातात

का दान करावे

.

पितरांचे आशिर्वाद मिळविण्यासाठी काळ्या तिळाचे पितृ पक्ष अमावस्येला दान करावे

काळे तीळ

.

गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान या दिवशी केल्याने आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडत नाही

अन्नदान

गरिबांना पैसे देणे वा त्यांना कपडालत्ता पितृ पक्ष अमावस्येला पुरविल्याने पितरांचा आशिर्वाद मिळून थांबलेली कामं पूर्ण होतात

धनदान

याशिवाय या वस्तूंचे दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि सुखसमृद्धी प्राप्त होते

दोषमुक्ती

मेहनत करूनही यश मिळत नसेल तर पितृ पक्षात या वस्तूंचे दान केल्याने लवकर यशप्राप्ती होईल

कार्यात यश

ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार असून आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

रस्त्यात मृत कावळा दिसण्याचे काय आहेत संकेत?