बदलत्या हवामानामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. अशा वेळी गरम आणि पौष्टिक पेय प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य चांगले राहते.
काही घरामध्ये हळदीचे दूध हे एक पेय आहे. हळदीमध्ये अॅण्टी इंफ्लेमेटरी आणि अॅण्टी वायरल गुणधर्मांनी समृद्ध आहे. रात्री झोपण्यापूर्वी हे प्यायल्याने शरीर उबदार राहते आणि चांगली झोप येते
हिवाळ्यात आले हे सर्वोत्तम तापमानवाढ करणारे घटक मानले जाते. आल्याचा चहा प्यायल्याने सर्दी, घसा दुखणे आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
तुळस, लवंग आणि काळी मिरी एकत्र करुन तयार केलेल्या चहामुळे संसर्ग आणि विषाणूपासून आराम मिळतो. हे घसा खवखवणे, बंद नाक आणि थंडी वाजण्याची समस्या दूर होते
दालचिनी शरीराचे तापमान वाढवण्यास मदत करते. हे कोमट पाणी किंवा दूधात मिसळून रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि चयापचय देखील जलद होते.
हिवाळ्यामध्ये बदाम आणि केसरचे दूध पिणे फायदेशीर आहे. हे दोन्ही शरीर उबदार ठेवते. लहान मुल आणि वृद्धांसाठी फायदेशीर आहे
जर तुम्हाला चरबी कमी करायची असेल तर हे प्येय उत्तम आहे. गरम पाण्यामध्ये लिंबू आणि मध मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. गळ्याची सूज कमी होते
साखरेऐवजी गूळ मिसळून चहा पिणे फायदेशीर आहे. गूळामध्ये आयरन असते. हिवाळ्यात पचन आणि ऊर्जा वाढविण्यास मदत करते