दररोजच्या आहारात या गोष्टींचा करा समावेश

Life style

07 December, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

हिवाळ्यात आजारपण आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करावा. या हंगामात बॅक्टेरिया आणि विषाणूंपासून बचाव करण्यासाठी तुमच्या आहारात या सुपरफूड्सचा समावेश करा.

हिवाळ्यात काय खावे

हिवाळ्यामध्ये व्हिटॅमीन, मिनरल यांसारखे पालक, मेथी यांसारख्या भाज्यांचा आहारात समावेश करा. हे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे

हिरव्या पालेभाज्या

डाळी आणि बीन्स

मसूर, मूग, राजमा यासारख्या डाळींमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्या शरीराला ऊर्जा देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

संत्री आणि लिंबूवर्गीय फळे

संत्री, लिंबू आणि हंगामी फळ यामध्ये व्हिटॅमीन सी असते. हिवाळ्यात सर्दी आणि खोकला टाळतो

आले आणि हळद

आले आणि हळदीमध्ये त्यात दाहक-विरोधी आणि जीवाणूरोधी गुणधर्म आहेत, जे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास शक्तिशाली आहेत. हिवाळ्यात घसा आणि पोटाच्या समस्या दूर करतात.

दही आणि प्रोबायोटिक्स

दह्यामध्ये चांगले बैक्टेरिया असते. जे पोट चांगले ठेवण्यास मदत करते. पचनसंस्था मजबूत करून, शरीर रोगांशी लढण्यास सक्षम होते.

नट आणि बिया

बदाम, अक्रोड, सूर्यफूल आणि भोपळा बिया व्हिटॅमीन ई आणि निरोगी चरबीचा स्रोत आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच त्वचा आणि केसासांसाठी फायदेशीर आहे.

लहसूण आणि कांदा

लहसूण आणि कांदामध्ये अॅण्टीऑक्सीडेट्स आणि अॅण्टीबैक्टेरिया गुणधर्म असते. हे शरीराचे संक्रमणांपासून संरक्षण करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.