चुकीचे रक्त शरीरात गेल्यावर शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा सक्रिय होते. ती नवीन रक्तातील पेशींना परकीय म्हणून ओळखते.
Picture Credit: Pinterest
शरीरात असलेले अँटीबॉडी त्या चुकीच्या रक्तगटाच्या लाल रक्तपेशींवर हल्ला करतात आणि त्यांना फोडून टाकतात.
Picture Credit: Pinterest
या प्रक्रियेमुळे व्यक्तीला अचानक ताप येतो, थंडी वाजते आणि अंगात कंप सुटतो.
Picture Credit: Pinterest
रक्तपेशी तुटल्याने विषारी द्रव्ये रक्तात मिसळतात, ज्यामुळे रक्तदाब झपाट्याने खाली येतो आणि व्यक्तीला चक्कर येऊ शकते.
Picture Credit: Pinterest
तुटलेल्या रक्तपेशींचे अवशेष मूत्रपिंडांवर ताण आणतात. त्यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो.
Picture Credit: Pinterest
शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो आणि व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. कधी-कधी छातीत दुखणेही जाणवते.
Picture Credit: Pinterest
वेळीच उपचार न केल्यास ही अवस्था जीवघेणी ठरू शकते. तातडीने रक्त संक्रमण थांबवून वैद्यकीय उपचार देणे आवश्यक असते.
Picture Credit: Pinterest