Published Dev 03, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
थंडीत सतत वातावरण बदल होत असतो आणि त्यामुळे डाएट संतुलित राखणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून प्रतिकारशक्ती चांगली राहील
आजकाल शहर असो वा गाव रोज गव्हाची चपाती प्रत्येकाच्या घरात बनते. पण भारतात वेगवेगळ्या पद्धतीची चपाती वा भाकरी खाल्ली जाते
गव्हात कॅल्शियमशिवाय लोह, बी6, प्रोटीन, कार्ब्स, फायबर, फॅट्स, सेलेनियम, मँगनीज, बी9, कॉपर, फोस्फोरस असे पोषक तत्व आढळतात
गव्हाची चपाती खाल्ल्याने शरीराला वरील पोषक तत्व मिळतात आणि याशिवाय अनेक फायदे मिळतात
बाजरीमध्ये बी1, बी2, बी3, बी9, लोह, मॅग्नेशियम, प्रोटीन, फायबर, जिंक, फॉस्फोरशिवाय अनेक अँटीऑक्सिडंट्स आढळतात
बाजरीची प्रकृती उष्ण असून गहू हे थंड प्रकृतीचे असतात, त्यामुळे थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाल्ल्याने अधिक उर्जा मिळते
.
याशिवाय बाजरीचे धान्य हे ग्लुटन फ्री असून पोटासाठी याचा अधिक फायदा मिळतो आणि पचनक्रियाही वाढते
.
बाजरी ग्लुटन फ्री असल्याने पोट फुगत नाही आणि याशिवाय लवकर वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.