Published August 20, 2024
By Swarali Shaha
Pic Credit - Social Media
मानवाने सर्वात पहिल्यांदा अन्न कधी शिजवले? जाणून घ्या इतिहास
मानवी उत्क्रांतीतील अग्नीचा शोध ही एक महत्त्वाची घटना होती
आगीचा शोध लागल्याने आदिमानवाला थंडीपासून आणि रात्री प्राण्यांपासून संरक्षण मिळाले
.
संशोधकांनुसार, मेंदूचा विकास होण्यासाठी मानवी पूर्वजांना जास्त कॅलरीजची गरज होती, जी अन्नमुळे शक्य झाली
पुराव्यांवरून असे दिसून येते की सुमारे 2 दशलक्ष वर्षांपूर्वी मानवांनी अन्न शिजवून खाण्यास सुरुवात केली
आदि मानवांच्या अन्न सवयींशी संबंधित पुरावे जीवशास्त्रात सापडली आहे. 50 हजार वर्षे जुन्या दातांमध्ये स्टार्च अडकल्याचे आढळले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील वंडरवर्क गुहेत सापडलेल्या राखेमुळे दशलक्ष वर्षांपूर्वी अन्न शिजवले जात असल्याचा संशय आहे.
1.6 दशलक्ष वर्षांपूर्वी केनियातही आग लागल्याचेही पुरावे सापडले आहेत.
होमो इरेक्टस हे पहिले मानवासारखे दिसणारे आदिमानव होते. अन्न शिजवणारे हे पहिले लोक असावेत असा संशय आहे