यावर्षी फाल्गुन शुक्ल एकादशी तिथी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 12 वाजून 33 मिनिटांनी सुरू होणार आहे
Picture Credit: Pinterest
या तिथीची समाप्ती 27 फेब्रुवारी रोजी रात्री 10.32 वाजता होणार आहे. यामुळे आमलकी एकादशी 27 फेब्रुवारी रोजी आहे
Picture Credit: Pinterest
या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग तयार होत आहे. भगवान विष्णूची पूजा करून आणि दान करून मोक्ष मिळवता येतो.
Picture Credit: Pinterest
यासोबतच, व्यक्तीला त्याच्या दुःखांचा अंत, आर्थिक लाभ, ज्ञानप्राप्ती आणि मुलांचे सुख मिळते. याशिवाय एकादशीला आवळा अर्पण केल्याने परमेश्वर सर्वात मोठ्या दुःखांचाही अंत करतो.
Picture Credit: Pinterest
दरम्यान, भगवान विष्णूला केळी अर्पण केल्याने आणि ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्यानेही ते प्रसन्न होतात. तसेच सर्व इच्छा पूर्ण होतात आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
Picture Credit: Pinterest
एकादशीच्या व्रताचे पारण वेळ 28 फेब्रुवारी रोजी पहाटे 6.47 ते 9.6 वाजेपर्यंत असणार आहे.
Picture Credit: Pinterest
भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी एकादशीला नैवेद्यात तुळशीची पाने घाला. नैवेद्याला तुळशीच्या पानांचा समावेश केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो.
Picture Credit: Pinterest