आषाढ महिन्यात पौर्णिमेला गुरूला गुरुदक्षिणा देत गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेचा सण भारतासोबतच नेपाळ, भूतान मध्येही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Picture Credit: Pinterest
गुरुपौर्णिमा बुधवार, २९ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. गुरू म्हणजे ईश्वर, गुरू म्हणजे परमेश्वर.
Picture Credit: Pinterest
भारतात पार पूर्वीपासून गुरुकुलाची पद्धत चालत आलेली आहे. भारतामध्ये गुरुला ईश्वराचे स्थान दिले जाते.
Picture Credit: Pinterest
ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळते त्या सगळ्यांचा या दिवशी सन्मान करण्याचा दिवस असतो. सर्वांत पहिला गुरू आपली आई, दुसरे ईश्वर, तिसरे पुस्तक, तत्व, ज्ञान याचा सन्मान केला जातो.
Picture Credit: Pinterest
जीवनातील अंधार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरूंप्रती आदर व्यक्त करणे हा यामागचा खरा उद्देश असतो.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
भारतीय संस्कृतीमध्ये महर्षी व्यास यांना पहिले गुरू आणि जगद्गुरू मानले जाते. कारण त्यांनी मानवाला वेद, पुराण, अध्यात्माचे ज्ञान दिले. महाभारत ग्रंथांची रचना केली.
Picture Credit: Pinterest
बोध प्राप्त झाल्यानंतर बुद्धांनी सारनाथ येथे याच दिवशी आपल्या शिष्यांना प्रवचन दिले त्यामुळे बौद्ध धर्मामध्ये हा दिवस विशेष मानला जातो.
Picture Credit: Pinterest
गुरुपौर्णिमेच्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयामधील मुले आपल्या शिक्षकांप्रती विविध कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.