चैत्र महिन्यातील विनायक चतुर्थी रविवार, 22 मार्च रोजी आहे. चैत्र महिन्यातील या व्रताला वासुदेव विनायक चतुर्थी असे देखील म्हटले जाते.
Picture Credit: Pinterest
निर्णायसिंधु आणि व्रतराज ग्रंथात या व्रताला सर्वार्थ सिद्धिदायक व्रत म्हटले आहे. काही भागात याला वरद विनायक व्रत असेही म्हणतात.
Picture Credit: Pinterest
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात 21 मार्च रोजी रात्री 11.56 वाजता होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 22 मार्च रोजी रात्री 9.16 वाजता समाप्ती होणार आहे.
Picture Credit: Pinterest
सर्वांत पहिले विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर देव्हारा स्वच्छ करून घ्यावा आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करावी.
Picture Credit: Pinterest
गणपती बाप्पाला दुर्वा, लाडू, मोदक, सिंदूर, शमीपत्र आणि सुपारी अर्पण करा आणि षोडशोपचार पूजा करा.
Picture Credit: Pinterest
गणपती अथर्वशीर्ष, रणहर्ता गणेश स्तोत्र, संकटनाशन गणेश स्तोत्र इत्यादी पठण करून गणेशाला प्रसन्न करा.
Picture Credit: Pinterest
विनायक चतुर्थीच्या दिवशी कथा ऐका किंवा पठण करा
Picture Credit: Pinterest