Published Sept 17, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
सूर्योदय आणि सूर्यास्ताशी संबंधित अनेक तथ्ये आहेत.
सूर्योदय म्हणजे सूर्याचा उगम.
सूर्य क्षितिजावरून खाली सरकून अदृश्य होण्याला सूर्य मावळणे किंवा सूर्यास्त म्हणतात
.
भारतातील कोणत्या ठिकाणी सर्वात पहिला किंवा सर्वात आधी सुर्योदय होतो?
या प्रश्नाचं उत्तर अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल भारतातील पहिले सूर्योदयाचे राज्य आहे.
अंजाऊ जिल्ह्यातील डांग या गावात सूर्य प्रथम उगवतो. हे शहर भारताचे जपान म्हणून ओळखले जाते.
अरुणाचलला उगवत्या सूर्याची भूमी असेही म्हणतात.
डोंग या गावात पहाटे 3 वाजल्यापासून सूर्याची किरणे पडू लागतात.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील गुहर मोती या ठिकाणी सर्वात आधी सूर्यास्त होतो.
जगातील प्रथम सूर्योदय हा न्यूझीलंड देशातील ईस्ट केप येथे होतो.