www.navarashtra.com

Published Dec 17,  2024

By Divesh Chavan

विमानाच्या वॉशरूममधील मलमूत्र जात तरी कुठं? 

Pic Credit -  Pinterest

विमानांच्या वॉशरूममध्ये व्हॅक्यूम-आधारित सिस्टम असते, जी 1982 पासून वापरली जाते. यामुळे कमी पाणी वापरून मलमुत्र खेचून टाकते.

विमानातील वॉशरूमचे तंत्रज्ञान

वॉशरूममधील फ्लश बटण दाबल्यावर हवेच्या कमी दाबामुळे मलमुत्र एका सेकंदात वेगाने एका टाकीत जमा होते.

वायुवेगाने निचरा

मलमुत्र विमानाच्या वेस्ट होल्डिंग टाकीत साठवले जाते. ही टाकी विमानाच्या मागील भागात सुरक्षितरीत्या बसवलेली असते.

Waste Tank

टाकीला गंध बाहेर न येण्यासाठी त्याला सीलबंद केली जाते. याशिवाय ती स्टेनलेस स्टीलची असल्याने गळती होत नाही.

गंध व टाकीची संरचना

विमान लँड झाल्यावर ग्राउंड क्रू टाकी रिकामी करते. यासाठी विशेष व्हॅक्यूम ट्रक किंवा पाईप्सचा वापर होतो.

जमिनीवर टाकी रिकामी करणे

विमान उड्डाण करत असताना वॉशरूमचा कचरा हवेत फेकला जात नाही. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि सुरक्षिततेसाठी घातक ठरू शकते.

विमानातील कचरा बाहेर जातो का?

काही विमान कंपन्या वॉशरूममध्ये केमिकलयुक्त Blue Fluid चा वापर करतात. हा द्रव वास आणि जीवाणू रोखण्यासाठी मदत करतो.

Blue Fluid