Published Dec 13, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
चॉकलेट ब्राउनी हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो
यंदाच्या ख्रिसमसला तुम्ही घरीच ओव्हनशिवाय टेस्टी चॉकलेट ब्राउनी तयार करु शकता
मैदा, बेकींग पावडर, मीठ, कोको पावडर, डार्क कंपाउंड चाॅकलेट, बटर, दही, व्हॅनिला इसेन्स, साखर इ.
प्रथम कुकरमध्ये मीठाचा थर करुन यात एक स्टॅंड ठेवा
मैदा, कोको पावडर, मीठ, बेकींग पावडर एकत्र चाळून घ्या
आता चाॅकलेट आणि बटर डबस बाॅयलरमध्ये वितळवून घ्या
.
आता वितळलेल्या चाॅकलेटमध्ये दही, व्हॅनिला इसेन्स, साखर घालून फेटून घ्या
.
हे लिक्वीड मैद्याच्या मिश्रणात टाकून एकत्र करा आणि एका ट्रेवर पसरवा
.
हा ट्रे कुकरमधील स्टॅंडवर ठेवा आणि 30-35 मिनिटे मंद आचेवर बेक करा
.
टूथपीक टाकून ब्राउनी शिजली की नाही ते चेक करा आणि थंड झाल्यावर यावर चॉकलेट साॅस टाकून सर्व्ह करा
.