Published Oct 22, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
रस्त्यावरून चालताना तुम्ही अनेक प्रकारचे ट्रॅफिक सिग्नल पाहिले असतील.
ट्रॅफिक जामची समस्या 1800 च्या दशकापासून सुरू आहे.
त्या काळात रस्ते पादचाऱ्यांनी आणि घोडागाड्यांनी गजबजलेले होते.
पहिला ट्रॅफिक सिग्नलचा शोध रेल्वे सिग्नलिंग इंजिनियर जेपी नाइट यांनी लावला .
डिसेंबर 1868 मध्ये जगातील पहिला ट्रॅफिक सिग्नल लंडनच्या वेस्टमिन्स्टर भागात बसवण्यात आला.
आता भारतात पहिला सिग्नल कोणत्या ठिकाणी लागला माहिती आहे का?
तुमच्या मनात मुंबई किंवा दिल्ली शहराच नाव आलं असेल तर तुमचं उत्तर चुकलं आहे.
पहिला ट्रॅफिक सिग्नल 1953 मध्ये चेन्नई येथे लावण्यात आला.
चेन्नई शहरातील एग्मोर जंक्शन या ठिकाणी पहिला ट्रॅफिक सिग्नल लावला गेला.