Published Dev 15, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
घरात सकारात्मक उर्जेसाठी नेहमीच संध्याकाळच्या वेळी कापूर जाळला जातो. घरात कापूर कुठे ठेवावा जाणून घेऊया
घरात कोणतीही वस्तू ठेवताना वास्तुशास्त्राचे पालन करावे असं म्हटलं जातं. यामुळे घरात वास्तुदोष राहत नाही
घरात अशा अनेक जागा आहेत, जिथे कापूर ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे धनप्राप्ती होते आणि जीवनात बदल होतात
वास्तुशास्त्रानुसार तिजोरीत कापूर ठेवल्याने धनप्राप्तीचे सर्व मार्ग खुले होतात, तसंच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो
घरातील मुख्य दाराजवळ कापूर ठेवणं अत्यंत शुभ ठरतं. यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि लक्ष्मीचे आगमन होते
वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये कापूर ठेवणंही खूपच लाभदायक मानले जाते. यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते
.
घरातील या जागांवर कापूर ठेवल्याने आर्थिक स्थितीत वृद्धी होते आणि याशिवाय व्यवसायातील बाधा दूर होतात
.
घरात सतत भांडण होत असेल तर कापूर ठेवावा, यामुळे आयुष्यात सुखसमृद्धी आणि भरभराट होते
.
ही माहिती वास्तुशास्त्रानुसार असून आम्ही कोणताही दावा करत नाही
.