www.navarashtra.com

Published Nov 10,  2024

By  Harshada Jadhav

या पक्ष्यांची स्मरणशक्ती प्रचंड तल्लख

Pic Credit -  pinterest

जगभर पक्ष्यांच्या लाखो प्रजाती आढळतात. या सर्व पक्ष्यांची स्वतःची काही खासियत आहे.

पक्षी

पक्ष्यांच्या सौंदर्याने मानव आकर्षित होतो.

सौंदर्य

प्रत्येक पक्षाची एक खासियत असते, ज्यामध्ये सौंदर्य, बोलणे आणि स्मरणशक्ती यांचा समावेश असतो. 

खासियत 

असा एक पक्षी आहे जो आपल्या मेंदूचा वापर माणसांप्रमाणे करतो. हा पक्षी त्याच्या मेंदूसाठी ओळखला जातो.

मेंदू

काळ्या आणि पांढऱ्या रंगात दिसणाऱ्या या लहान पक्ष्याचे नाव चिकडी पक्षी आहे.

चिकडी 

उत्तर अमेरिकेत राहणारे हे छोटे पक्षी त्यांच्या स्मरणशक्तीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत.

स्मरणशक्ती

कडाक्याच्या थंडीत टिकून राहण्यासाठी, चिकडी पक्ष्यांना हे लक्षात ठेवावे लागते की त्यांनी हजारो ठिकाणी त्यांचे अन्न कुठे लपवले आहे.

अन्नाचं ठिकाण 

या पक्ष्याच्या मेंदूवर संशोधन करण्यात आले आहे. या पक्ष्यांमध्ये गुप्त मेमरी कोड असल्याचे आढळून आले आहे.

संशोधन 

प्रत्येक खाद्यपदार्थासाठी चिकडीच्या मेंदूमध्ये विशेष न्यूरल ॲक्टिव्हिटी असते. हे अगदी बारकोडसारखे आहे.

बारकोड

संशोधकांचे म्हणणे आहे की प्रत्येक स्मृती मेंदूच्या हिप्पोकॅम्पसमधील क्रियाकलापांच्या विशिष्ट पॅटर्नशी संबंधित आहे.

विशिष्ट पॅटर्न