Published Nov 7, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
परीक्षा हा शब्द आपल्या आयुष्याशी जोडला गेला आहे.
लहानपणापासून ते करिअरपर्यंत आपण सतत कोणत्या ना कोणत्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त असतो.
आज जाणून घेऊया जगात पहिली परीक्षा कधी आणि कुठे झाली.
आधुनिक परीक्षा पद्धतीची सुरुवात चीनमधून झाली असे इतिहासकारांचे मत आहे.
पहिली परीक्षा चीनमध्ये घेण्यात आली.
हजारो वर्षांपूर्वी चीनमध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षा घेतल्या जात होत्या.
चीनमध्ये घेतल्या जाणाऱ्या या परीक्षांना 'इम्पीरियल एक्झामिनेशन' असे म्हणतात.
या परीक्षांमध्ये मंदारिन भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला.
ब्रिटीश राजवटीत भारतात परीक्षा पद्धती आली.
ब्रिटिश सरकारने भारतातही सरकारी नोकऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षा सुरू केल्या.
या परीक्षांमध्ये इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य होते .
19व्या आणि 20व्या शतकात युरोप आणि अमेरिकेत आधुनिक परीक्षा पद्धती विकसित झाली.