प्रत्येक देशाच्या सुरक्षिततेसाठी सैन्यबळ महत्वाचे असते.
Picture Credit: Pinterest
मात्र, काही देश असे सुद्धा आहेत. ज्यांच्याकडे स्वतःचे सैन्यबळ नाही.
असाच एक देश म्हणजे कोस्टा रिका. हा देश मध्य अमेरिकेत स्थित आहे.
या देशाची लोकसंख्या 52 लाख आहे तर क्षेत्रफळ 51 हजार वर्ग किलोमीटर आहे.
1948 मध्ये कोस्टा रिकात गृहयुद्ध झाले होते, जे 44 दिवस चालले होते.
युद्धात विजय मिळवल्यावर या देशाने एक महत्वाचा निर्णय घेतला.
आम्ही आमचे सैन्य कायमचे समाप्त करीत आहोत. कारण आम्हाला भविष्यात शस्त्रांपेक्षा शिक्षणावर लक्ष द्यायचे आहे.
हा निर्णय 1949 मध्ये कोस्टा रिकाच्या संविधानात अनुच्छेद 12 मध्ये समाविष्ट करण्यात आला.