www.navarashtra.com

Published Nov 26,  2024

By  Harshada Jadhav

कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणता देश अव्वल?

Pic Credit -  pinterest

देशात कायदा आणि सुव्यवस्था किती मजबूत आहे, यानुसार त्या देशातील नागरिक किती सुरक्षित आहेत हे ठरवलं जातं.

कायदा 

जागतिक न्याय प्रकल्प (WJP) दरवर्षी जगातील सर्व देशातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत कायदा नियम निर्देशांक जारी करते.

जागतिक न्याय प्रकल्प

या निर्देशांकात 142 देशांचा समावेश असतो, त्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या देशाचा कायदा सर्वोत्तम मानला जातो.

निर्देशांक

वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट (WJP) रूल ऑफ लॉ इंडेक्स 2024 नुसार, डेन्मार्क या यादीत सर्वात वर आहे.

डेन्मार्क 

डेन्मार्कमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सर्वोत्तम आहे. 

सर्वोत्तम कायदा 

या यादीत नॉर्वे देश दुसऱ्या क्रमांकावर तर फिनलंड तिसऱ्या स्थानावर आहे.

नॉर्वे 

यादीत भारत 98 व्या क्रमांकावर आहे. 

भारत 

व्हेनेझुएला हा लॅटिन अमेरिकन देश या यादीत सर्वात खालच्या स्थानावर आहे. 

खालच्या स्थानावर

यादीत व्हेनेझुएला 142 व्या क्रमांकावर आहे.

व्हेनेझुएला

यादीत शेजारील देश पाकिस्तान 140 व्या क्रमांकावर आहे. 

पाकिस्तान 

कायद्याचे नियम निर्देशांकानुसार देशांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी अनेक महत्त्वाचे घटक विचारात घेतले जातात.

देशांची क्रमवारी

कायद्याचे पालन, सरकारी अधिकारावरील मर्यादा, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, न्याय मिळवणे, संविधानाचे पालन, इत्यादी. 

घटक