Published Sept 28, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
लोखंडाच्या कढईत कोणते पदार्थ बनवणे होईल घातक
काही पदार्थ लोखंडी कढईत शिजवल्यास शरीराला आणि आरोग्याला नुकसान पोहचू शकते. कोणते आहेत ते पदार्थ?
कढी, सांभार, रस्सम, लोणचं, लिंबू इत्यादी पदार्थ लोखंडी कढईत केल्यास अॅसिडिक त्रास होऊन पचनक्रिया बिघडते
कोणत्याही भाजीत तुम्ही जर टॉमेटोचा वापर करणार असाल तर लोखंडी कढई वा पॅन वापरू नये, यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो
.
वांग्याची भाजी चुकूनही कढईत करू नका, नैसर्गिक अॅसिडिक असणारी ही भाजी लोखंडासह संपूर्ण स्वाद बदलून त्रासदायक ठरू शकते
.
पालकमध्ये ऑक्सिलिक अॅसिड असून लोखंडाच्या भांड्यात शिजल्यास त्याचा रंग आणि स्वाद दोन्ही बिघडतो, आरोग्यासाठी नुकसानदायी आहे
दह्याचे कोणतेही पदार्थ लोखंडी कढईत न बनवणे योग्य कारण यामुळे अॅसिडिक रिअॅक्शन होते, आरोग्य बिघडते
माशाची त्वचा लोखंडी कढईला चिकटते आणि खराब होते, त्यामुळे माशांचे पदार्थ करू नयेत
लोखंडाच्या कढईत पदार्थ बनविल्यास त्वरीत बाहेर काढावा अन्यथा त्यातील लोहामुळे रंग आणि स्वाद बदलतो
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही