Written By: Prajakta Pradhan
Source: Pinterest
दुधासोबत आंबट फळे खाऊ नये. लिंबूवर्गीय फळांमध्ये आम्लयुक्त गुणधर्म असतात, जे पोटात गेल्यानंतर पचनाशी संबंधित समस्या निर्माण करू शकतात.
दुधासोबत कधीही कच्चा आंबा खाऊ नये. कच्च्या आंब्यामध्ये आम्लयुक्त गुणधर्म देखील असतात, जे पोटात गेल्यानंतर पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकतात.
दुधासोबत कधीही पपई खाऊ नये. या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्यास पचन व्यवस्था बिघडू शकते आणि अतिसाराची समस्या होऊ शकते.
दुधासोबत कधीही डाळिंब खाऊ नये. दुधासोबत डाळिंब खाल्ल्याने तब्येत बिघडू शकते.
दुधासोबत कधीही अननस खाऊ नये. त्यात आम्लयुक्त गुणधर्म देखील असू शकतात. ज्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते.
दुधासोबत पेरू खाणे टाळा. असे केल्याने तुम्हाला पचनाच्या समस्या तर होऊ शकतातच पण तुम्हाला अॅलर्जीची समस्या देखील होऊ शकते.
दुधासोबत आलुबखडा खाऊ नका. त्याचे सेवन केल्याने तुमच्या पचनावर वाईट परिणाम होऊ शकतो.