धनत्रयोदशीला देवाची पूजा केली जाते

Life style

14 October, 2025

Author:  नुपूर भगत

धनत्रयोदशी हा दिवाळीच्या सणातील पहिला दिवस असतो. हा दिवस कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला साजरा केला जातो.

दिवाळीचा पहिला दिवस

Picture Credit: Pinterest

या दिवशी प्रामुख्याने धन्वंतरि देव आणि कुबेर देव यांची पूजा केली जाते. धन्वंतरि हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात.

  देवाची पूजा केली जाते

Picture Credit: Pinterest

धन्वंतरि देव समुद्र मंथनातून अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळे त्यांना आरोग्य, दीर्घायुष्य, औषधांचे देवता मानले जाते.

धन्वंतरि देवाचे महत्व

Picture Credit: Pinterest

कुबेर हे धनाचे देव आहेत. त्यांची पूजा केल्याने घरात समृद्धी, धन आणि सुखशांती नांदते असा विश्वास आहे.

 कुबेर देव

Picture Credit: Pinterest

लोक या दिवशी आपली तिजोरी, सोनं-चांदी, पैसे आणि मौल्यवान वस्तूंची पूजा करतात. याला धनपूजन म्हणतात.

  काय केले जाते

Picture Credit: Pinterest

धन्वंतरि देवाकडे निरोगी जीवनासाठी आणि कुबेर देवाकडे आर्थिक स्थैर्यासाठी प्रार्थना केली जाते.

 आरोग्य-संपत्तीची प्रार्थना

Picture Credit: Pinterest

धनत्रयोदशी हा दिवस आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा संदेश देतो. त्यामुळे या दिवशी दोन्ही देवतांची भक्तिभावाने पूजा केली जाते.

 सांस्कृतिक महत्त्व

Picture Credit: Pinterest