दूध पिणं हे शरीरासाठी फायदेशीर आहे असं डॉक्टर कायमच सांगतात.
Picture Credit: Pinterest
असं असलं तरी एक प्रश्न कायमच पडतो दूध गायीचं चांगलं की म्हशीचं?
खरं सांगायचं तर, दोन्ही पौष्टिक असतात, पण त्यांच्या गुणधर्मांमध्ये काही फरक आहे.
असं म्हणतात की गायीचं आणि आईचं दूध हे सारखं असतं.
गायीचं दूध हलकं असतं, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि पोटाचे त्रास असलेल्यांसाठी फायदेशीर आहे.
फॅट कमी असल्यामुळे गायीच्या दूधामुळे वजन देखील वाढत नाही.
गायीच्या दूधात व्हिटॅमिन B2, B12, आणि D ची मात्रा असल्याने त्वचेसाठी फायदेशीर आहे.
फॅट कमी असल्यामुळे गायीच्या दूधामुळे वजन देखील वाढत नाही.
गायीच्या दूधात व्हिटॅमिन B2, B12, आणि D ची मात्रा असल्याने त्वचेसाठी फायदेशीर आहे.
म्हशीच्या दुधात फॅट आणि कॅल्शियम जास्त असतं. त्यामुळे हाडं मजबूत होतात आणि ऊर्जा मिळते.
जास्त शारीरिक मेहनत घेणाऱ्यांसाठी म्हशीचं दूध जास्त फायदेशीर ठरतं.
वजन कमी करायचं असेल, पचनशक्ती कमकुवत असेल अशांनी कमी प्रमाणात म्हशीचं दूध प्यावं.