Written By: Mayur Navle
Source: Yandex
उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला आहे. या सीझनमध्ये अनेक जण आंब्यांचा आस्वाद घेत असतात.
जेव्हा मुघल भारतात आले तेव्हा येथील आंब्यांच्या चवीने त्यांना भुरळ पाडली.
मुघलांना आंबे एवढे आवडले की त्यांनी आपल्या राजवटीत आंब्याची लागवड सुरू केली.
त्याकाळी मुघलांना सर्वात जास्त लखनऊ आणि फैजाबाद मधील आंबे खूप आवडायचे.
तसेच पश्चिम बंगालमधील आंबे देखील दिल्ली आणि आग्राच्या दरबारात पोहोचायचे.
अकबर, शहाजान आणि औरंगजेब या मुघल बादशहांना आंबे खूप आवडायचे.
अकबरला तर आंबे एवढे आवडले की त्याने 1 लाख आंब्याच्या झाडांची लागवड केली.