पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाणे फायदेशीर

Lifestyle

18 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

भाज्या खाण्याचे फायदे

या भाज्यांमध्ये भरपूर फायबर आणि पोषकतत्वे असतात, मात्र कॅलरीज कमी असतात. यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहते, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Picture Credit: Pinterest

हा पचायला अतिशय हलका असून यात भरपूर पाणी आणि फायबर असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते, वजन कमी होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

दुधी भोपळा

Picture Credit: Pinterest

दोडका

दोडका शरीराला नैसर्गिक थंडावा देतो. यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात,तसेच हे पोटाचे आरोग्य सुधारून पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास अत्यंत फायदेशीर आहे.

Picture Credit: Pinterest

कारल्यामध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म असतात, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे वरदान मानले जाते. हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून यकृताचे आरोग्य सुधारते.

कारले

Picture Credit: Pinterest

गवारीमध्ये भरपूर प्रमाणात डायटरी फायबर आणि विटॅमिन्स असतात. ही भाजी पचनासाठी उत्तम असते आणि कोलेस्ट्रॉल तसेच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

गवार 

Picture Credit: Pinterest

गावरान किंवा रानभाज्या

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात मिळणाऱ्या अळू, टाकळा, भारंगी आणि करटोली यांसारख्या गावरान भाज्या औषधी गुणधर्मांनी युक्त असतात

कोणत्या भाज्या खाणे टाळावे

Picture Credit: Pinterest

हवेमध्ये ओलावा (दमटपणा) जास्त असल्यामुळे पालक, मेथी, कोबी यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये किडे आणि बॅक्टेरिया होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो पालेभाज्या खाणे टाळावे किंवा खाताना त्या गरम पाण्यात मीठ टाकून चांगल्या स्वच्छ धुवून आणि पूर्णपणे शिजवून खाव्यात