Published Dec 19, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
आज प्रत्येकाच्या घरी फ्रीज पाहायला मिळते. फ्रीजचा वापर हा पदार्थ आणि भाज्या फ्रेश ठेवण्यासाठी केला जातो.
काही जणांच्या घरात फ्रीज एवढा भरलेला असतो की त्यात कुठली गोष्ट कुठे आहे हे समजत नाही.
परंतु, काही भाज्या अशा सुद्धा आहेत, ज्या फ्रीजमध्ये ठेवल्यास नुकसान सुद्धा होऊ शकते.
चला जाणून घेऊया, अशा कोणत्या भाज्या आहेत ज्यांना फ्रीजमध्ये ठेवू नये.
टॉमेटोमध्ये अनेक पोषक तत्व असतात. परंतु, याला फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचे पोषक तत्व कमी होतात.
काही लोकं फ्रीजमध्ये कांदा सुद्धा ठेवतात, जेणेकरून तो फ्रेश राहील. पण असे केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
बटाट्यात असणारे स्टार्चयुक्त कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेटमध्ये बदलतात. जे नंतर शरीराला फायदेशीर होत नाही.
.
सगळ्याच पदर्थांमध्ये आल्याचा वापर केला जातो. परंतु आलं फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील तत्व कमी होतात.
.