Published Sept 26, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - Respected Owners
टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिअॅलिटीशो बिग बॅास प्रेक्षकांच्या पसंतीचा आहे, या कार्यक्रमाचे १७ सिझन झाले आहेत त्याचे विजेते कोण आहेत यावर एकदा नजर टाका.
अरशद वारसी यांनी होस्ट केले बिग बॉसचा पहिला सिझन आशिकी चित्रपटामध्ये कमाल करणारा राहुल रॅाय याने गाजवला होता.
बिग बॅास सिझन 2 मध्ये शिल्पा शेट्टीने कार्यक्रमाचे होस्टिंग केले होते, यामध्ये आशुतोष कौशिक हा विजयी ठरला होता.
बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेता विंदू धारा सिंग यांनी बिग बॉसचा तिसरा सिझन नावावर केला होता, हा सिझन अमिताभ बच्चन यांनी होस्ट केला.
टेलिव्हिजनवरची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने बिग बॉस सिझन ४ गाजवला होता, या सीझनमध्ये सलमान खानने शोची होस्टिंग सुरु केली.
सास भी कभी बहू थी या मालिकेमधून प्रसिद्ध झालेली जुही परमार हिने बिग बॉस सिझन ५ नावावर केला होता.
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध खलनायिका उर्वशी ढोलकीया हिने बिग बॅास सिझन ६ मध्ये कमाल केली होती आणि प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
बिग बॅास सिझन ७ प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता, यामध्ये गौहर खान हिने तिचे मतांमुळे चाहत्यांची मनं जिंकली होती आणि विजयी झाली होती.
बिग बॅास सिझन ८ ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते, या सीझनमध्ये प्रेक्षकांनी गौतम गुलाटीला विजेता ठरवले होते.
प्रिन्स नरूला याने अनेक रिऍलिटी शो जिंकले आहेत, यामध्ये त्याचे आणि अभिनेत्री युविका चौधरीसोबतचे नाते लोकांना आवडले होते.
सेलिब्रिटी आणि सामान्य माणूस असा पहिल्यांदा बिग बॉसमध्ये घडले होते, यावेळी सामान्य माणूस म्हणून घरामध्ये येणारा मनवीर गुजर विजयी ठरला होता.
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका भाभीजी घर पर हैं मधील शिल्पा शिंदे हिने बिग बॉस सिझन ११ गाजवला होता.
टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेत्री सिमर म्हणून घराघरात पोहोचलेली दीपिका कक्करने बिग बॉस १२ जिंकला होता.
बिग बॉसचा सर्वात हिट सिझन १३ मध्ये स्पर्धकांना भरभरून प्रेम मिळाले, परंतु या सीझनचा विनर सिद्धार्थ शुक्ला झाला आहे.
कमालीची अभिनेत्री रुबिना दिलेकने तिच्या चातुर्याने बिग बॉस सिझन १४ नावावर केला होता, यामध्ये तीला भरभरून प्रेम दिले होते.
नागीण म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने बिग बॉसचा सिझन १५ नावावर केला होता.
प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅनने त्याच्या मजबूत फॅन फॉलोईंगमुळे बिग बॉस सिझन १६ जिंकला होता, या सीझनमधील अनेक स्पर्धकांना भरभरून प्रेम मिळाले.
कॉमेडियन मुनावर फारुकीने त्याच्या सीझनमध्ये बुद्दीचा वापर करून त्याने बिग बॉसचा सिझन १७ नावावर केला होता.