www.navarashtra.com

Published March 21 ,  2025

By  Trupti Gaikwad

पाचवीला पुजलेली सटवाई म्हणजे नक्की कोण ? 

Pic Credit -Google Photo

सटवाई जन्मलेल्य़ा बाळाचं भविष्य  लिहून जाते असं म्हटलं जातं.

 बाळाचं भविष्य

ही सटवाई म्हणजे नक्की कोण याबाबत 'किस्सों कीं दुनिया' या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे.

सटवाई

असं म्हटलं जातं बाळ जन्मल्यानंतर पाचव्या दिवसापर्यंत त्य़ाचं नशिब कोरं असतं.

नशिब 

पाचव्या दिवसानंतर बाळाच्या हातावर रेषा उमटतात आणि सटवाई बाळाचं नशिब लिहिते.

बाळाचं नशिब

पुराणानुसार , सटवाई ही सहाव्य़ा अंशापासून प्रगट झाली म्हणून तिचं नाव षष्ठी.

षष्ठी

ही सटवाई ब्रम्हदेवांची मानस कन्या आहे. बाळाचं दैव लिहिणारी ही देवी म्हणून ओळखलं जातं.

 मानस कन्या 

पाचव्या किंवा सहाव्या दिवशी संध्याकाळी शेणाच्या सारवून त्यावर सटवाईची पूजा केली जाते.

सटवाईची पूजा

पूजेत पाटी, पेन्सिल, वही, पैसे अशा वस्तू ठेवल्या जातात.

 शैक्षणिक वस्तू

बाळाला बोलता येत नाही म्हणून सटवाई बाळाशी बोलते.

संवाद

 सटवाई बाळाला हसवते, नशिब लिहिते आणि निघून जाते, असं म्हणातात.

बाळाला हसवते

या प्रथेमागचं तात्पर्य हे की शैक्षणिक वस्तूंची पूजा करुन बाळाच्या भविष्याचं नियोजन केलं जावं हा उद्देश असतो.

भविष्याचं नियोजन

रिकाम्या पोटी गुलकंद खाल्ल्याने काय परिणाम होतात?