Published Nov 04,, 2024
By Shweta Chavan
Pic Credit - iStock
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने ऐन निवडणुकीतच रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे.
याच वर्षी जानेवारीत रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदावर नियुक्ती केली होती.
रश्मी शुक्ला १९८८ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या IPS अधिकारी आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणूनही शुक्ला यांनी काम केलंय.
शुक्ला काही काळ पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी होत्या.राज्याच्या गुप्तचर शाखेचे संचालकपदही रश्मी शुक्ला यांनी भूषवलं आहे.
.
जून २०२४ मध्ये त्या सेवेतून निवृत्त होणार होत्या.पण सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती.
.
शुक्ला यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनी केली होती.
.
राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
.