Published Sept 28, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - BCCI Social Media
होस्ट रोहित शेट्टी यांचा शो खतरो के खिलाडी सध्या प्रचंड चर्चेत आहे, यामध्ये मागील १३ सीझनचे विजेते कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?
इंडस्ट्रीमधील मॉडेल आणि अभिनेत्री नेत्रा रघुरामन हिने खतरो के खिलाडी सिझन १ चे जेतेपद नावावर केले होते.
गायक आणि कम्पोजर अनुष्का मनचंदा खतरो के खिलाडी सिझन २ ची भाग होती यामध्ये ती दमदार कामगिरी करत जेतेपद जिंकले होते.
कुमकुम भाग्य प्रेम अभिनेता शबीर अहलुवालिया याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे, त्याचबरोबर त्याने खतरो के खिलाडी ३ चा विजेता ठरला आहे.
अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून इंडस्ट्रीमध्ये काम करणारी आरती छाब्रियाने खतरो के खिलाडी सिझन ४ ट्रॉफी नावावर केली होती.
बॉलीवूड अभिनेता रजनीश दुग्गल सुद्धा खतरो के खिलाडी सिझन ५ मध्ये सहभागी झाला आणि शोचा तो विजेता ठरला होता.
खतरो के खिलाडी सिझन ६ मध्ये आशिष चौधरीने कमालीची कामगिरी करत जेतेपद नावावर केले होते.
टेलिव्हिजनवर मालिकेमध्ये गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने बिग बॉस १३ आधी खतरो के खिलाडी ७ चे जेतेपद नावावर केले होते.
डान्स प्रशिक्षक आणि अभिनेता शंतनू महेश्वरीने खतरो के खिलाडी सिझन ८ चे जेतेपद नावावर केले होते, त्याच्या कामगिरीने रोहित शेट्टी सुद्धा प्रभावित झाले होते.
डान्स प्रशिक्षक पुनीत पाठक हा खतरो के खिलाडी सिझन ९ मध्ये सहभागी झाला होता, त्याने कमालीची कामगिरी करत सिझन नावावर केला होता.
अभिनेत्री करिश्मा तन्नाने दमदार कामगिरी करत खतरो के खिलाडी सिझन १० मधील मजबूत खेळाडूंना माघारी टाकत जेतेपद पटकावले होते.
टेलिव्हिजनचा होस्ट आणि अभिनेता अर्जुन बिजलानी याने खतरो के खिलाडी सिझन ११ मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत जेतेपद नावावर केले होते.
प्रशिक्षक आणि जज तुषार कालियाने खतरो के खिलाडी सिझन १२ गाजवला होता आणि जेतेपद देखील पटकावले होते.
रॅपर डिनो जेम्सने खतरो के खिलाडी सिझन १३ च्या सर्व स्पर्धकांना मागे टाकत जेतेपद जिंकले होते. यामध्ये अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश होता.