Published August 21, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
कृष्ण आणि कालियामध्ये घनघोर युद्ध झालं होतं. श्रीकृष्णाच्या आज्ञेवरूनच कालियाने यमुना नदी सोडली
कालिया नाग गेल्या जन्मी कोण होता? साप होण्याचा शाप त्याला कोणी दिला होता?
.
पौराणिक कथेनुसार गेल्या जन्मी कालिया 'वेदशिरा' ऋषी होते. ज्यांनी कठोर तपस्या केली होती.
ऋषी वेदशिरा यांच्या आश्रमात अश्वशिरा ऋषी आले होते. वेदशिरा ऋषींनी त्यांचा अपमान केला.
वेदशिरा ऋषींचा अहंकार पाहून अश्वशिरा ऋषींनी त्यांना पुढच्या जन्मी नाग होण्याचा शाप दिला
अशा या अहंकारी, मत्सरी कालियाला श्रीकृष्णाने नमवले, कालियामर्दन म्हणून ते ओळखले जाते
कालियाच्या पत्नींच्या सांगण्यावरून श्रीकृष्णाने त्याला माफ केले, मात्र नदी सोडण्याचा आदेश दिला