Crash Test मध्ये डमी का वापरतात? जाणून घ्या महत्त्वाची कारणे

Automobile

07 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Crash Test म्हणजे काय?

Crash Test म्हणजे वाहनाची सुरक्षितता तपासण्यासाठी नियंत्रित परिस्थितीत केलेली चाचणी. यामध्ये कारला वेगवेगळ्या प्रकारे धडक दिली जाते.

Picture Credit: Tata evofficial 

खऱ्या माणसाऐवजी डमी का?

अपघातात होणाऱ्या दुखापतींचा अभ्यास करण्यासाठी खऱ्या व्यक्तीऐवजी विशेष सेन्सर्स असलेली Crash Test Dummy वापरली जाते.

डमीमध्ये असतात शेकडो सेन्सर्स

डमीच्या डोक्यात, मानेला, छातीला, हात-पायांना आणि पायांमध्ये अनेक सेन्सर्स बसवलेले असतात. हे धडकेवेळी प्रत्येक भागावर किती ताण आला, याची अचूक माहिती नोंदवतात.

Crash Test दरम्यान एअरबॅग योग्य वेळी उघडते का आणि सीटबेल्ट प्रवाशाला किती सुरक्षित ठेवतो, हे डमीच्या मदतीने तपासले जाते.

Airbag आणि Seatbelt तपासण्यासाठी

फक्त प्रौढच नाही तर महिला, लहान मुले आणि बाळांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या डमीदेखील वापरल्या जातात.

वेगवेगळ्या वयाच्या डमी

हाय-स्पीड कॅमेरे सेकंदाला हजारो फोटो टिपतात. त्यामुळे धडकेच्या प्रत्येक क्षणाचा बारकाईने अभ्यास करता येतो.

हजारो फ्रेम्समध्ये रेकॉर्डिंग

एक प्रगत Crash Test Dummy ची किंमत लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांपर्यंत असू शकते. त्यातील अत्याधुनिक सेन्सर्स आणि मोजमाप प्रणालीमुळे ती महाग असते.

डमीची किंमत किती असते?

Crash Test मधील डेटा वापरून कंपन्या कारची रचना, एअरबॅग, सीटबेल्ट आणि इतर सुरक्षा प्रणाली अधिक प्रभावी बनवतात. त्यामुळे भविष्यातील गाड्या अधिक सुरक्षित होतात.

आपल्या सुरक्षिततेसाठीच ही चाचणी