हिंदू धर्मानुसार गणपतीला नैवेद्य दाखवताना 21मोदकांचं नैवेद्य दिलं जातं.
Picture Credit: Pinterest
यामागे विविध आख्यायिका सांगितल्या जातात.
पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं की, देवांतक आणि नरांतक असे दोन राक्षस होते.
या राक्षसांनी लोकांना खूप त्रास दिला.
याचकारणासाठी गणपती बाप्पाने त्याचा वध करायचं ठरवलं.
राक्षसांना मारायचं म्हणजे युद्ध अटळ होतं.
या युद्धासाठी बाप्पाने 20 सैनिक घेतले.
गणपती बाप्पा आणि सैनिकातले गण असे मिळून गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैैवेद्य दाखवला जातो.
याचा अर्थ 21 मोदक फक्त एकट्या बाप्पाला नाही तर त्या 20 सैनिकांना देखील दाखवला जातो.