दुचाकी चालवताना अचानक पुढचा ब्रेक का दाबू नये?

Automobile

 10 September, 2025

Author: मयूर नवले

दुचाकी चालवताना पुढचा ब्रेक दाबण्याची अनेकांना सवय असते.

दुचाकी

Picture Credit:  Pinterest

चला जाणून घेऊयात की दुचाकी चालवताना अचानक पुढचा ब्रेक का दाबू नये.

पुढचा ब्रेक

पुढचा ब्रेक जोरात दाबल्यास वजन अचानक पुढे सरकते आणि संतुलन ढासळते.

संतुलन बिघडते 

रस्त्यावर वाळू, माती किंवा पावसामुळे घसरण्याची  शक्यता वाढते.

घसरून पडण्याची शक्यता 

अचानक ब्रेक लावल्यानं पुढचं चाक लॉक होऊन बाईक सरळ सरकत जाते.

पुढचं चाक लॉक होतं 

चाक लॉक झाल्यानंतर हँडलवरचा ताबा कमी होतो.

स्टिअरिंग कंट्रोल सुटतो 

विशेषतः वळणावर किंवा ओल्या रस्त्यावर पुढचा ब्रेक दाबल्यास चाक घसरू शकतो.

फ्रंट व्हील स्लिप होईल 

 वेगात असताना अचानक पुढचा ब्रेक लावल्यास गाडी  उलटू शकते.

अपघाताची शक्यता वाढते