Published Oct 24, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media,
महाराष्ट्राच्या राजकारणातील आक्रमक नेता म्हणून ज्यांची ओळख होते ते राज ठाकरे.
राज ठाकरे यांनी लहाणपणापासूनच बाळासाहेबांचे राजकारण जवळून पाहिल्याने त्यांचा राजकारणाकडे कल निर्माण झाला.
1985 साली राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी स्वीकारली.
काकांसारखी ठाकरे शैली, आक्रमकता आणि वक्तृत्व यामुळे त्यांची लोकप्रियता राज्यभरात होती.
शिवसेनेमध्ये त्याकाळी राज ठाकरे यांना बाळासाहेबांचा राजकीय वारसदार म्हणूनही पाहिल जात होते.
1997 च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सक्रिय राजकारणात एन्ट्री घेतली.
उद्धव यांच्या सक्रियतेमुळे त्यानंतरच्या काळात राज ठाकरे आणि त्यांच्या जवळच्या लोकांना डावलल जात आहे अशी भावना त्यांच्यात होती.
2003 मध्ये महाबळेश्वरच्या अधिवेशतात उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले. आणि हे स्पष्ट झाले की उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे उत्तराधिकारी आहेत.
त्यानंतरच्या काळात राज ठाकरेंची पक्षातील सक्रियता कमी होत गेली.
2005 मध्ये राज ठाकरे यांनी अखेर शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला
9 मार्च 2006 साली राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.