तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की वेळेनुसार कारचे हेडलाइट्स पिवळे पडतात.
Img Source: Pinterest
गाडीच्या हेडलाइट्स पिवळ्या होण्यामागे अनेक कारणं असू शकतात.
याचे पहिले कारण म्हणजे सूर्याची अतिनील किरणे हेडलाइट्सच्या प्लास्टिकला नुकसान पोहोचवतात.
आणि दुसरे एक कारण म्हणजे, फॅक्टरीतून लेन्सवर UV-Coated थर येतो. जो कालांतराने घासतो.
अनेकदा असेही दिसून येते की धूळ माती आणि डांबराचे कण प्लास्टिकच्या पृष्ठभागावर जमा होतात आणि हेडलाईट पिवळी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
यासोबतच वातावरणातील धूर आणि रसायनांच्या संपर्कात आल्याने प्लास्टिक Oxidize होते. ज्यामुळे हेडलाइट्स पिवळी पडण्याचे मुख्य कारण आहे.
तसेच क्षमतेपेक्षा जास्त बल्ब लावल्यास जास्त उष्णता निर्माण होते. ज्यामुळे प्लास्टिक पिवळे आणि खराब होते.
यापासून वाचण्यासाठी, हेडलाइट्स स्वच्छ केल्यानंतर त्यावर सुरक्षात्मक UV कोटिंग करणे आवश्यक आहे.
टूथपेस्ट आणि बेकिंग सोडा वापरुन हेडलाइट्सचा पिवळेपणा साफ करता येतो.