ट्रेडीशनल कुर्ती असो किंवा साडी मुली यावर झुमके घालणं जास्त पसंत करतात.
Picture Credit: Pinterest
असं म्हणतात की, इअरिंगचे अनेक प्रकार आहेत, मात्र झुमके सौैंदर्य जास्त वाढवतात.
झुमके घातले की चेहऱ्याचा लूक अधिक उठून दिसतो.
प्रत्येक लूकसाठी वेगवेगळ्या झुमक्यांना मुली पसंती देतात.
आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर, कानाच्या भागात अनेक ऊर्जाबिंदू असतात.
कानात दागिने घातल्याने काही प्रमाणात उर्जा संतुलन राहते, असं मानलं जातं.
भारतीय संस्कृतीत झुमक्यांना धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व आहे.
सण, समारंभ किंवा विवाहसोहळा असो, झुमके हा स्त्रीसौंदर्याचा अविभाज्य भाग असतो.
प्राचीन काळी सोन्या-चांदीचे झुमके केवळ दागिने नव्हते, तर ते संपन्नतेचं आणि संस्कारांचं प्रतीक मानले जाते.