श्रावण म्हणजे व्रत वैकल्य आणि धार्मिक महिना म्हणून साजरा केला जातो.
Img Source: Pintrest
हिंदू धर्मात असं म्हणतात की, महादेवांना हा महिना अंत्यत प्रिय असतो.
श्रावणातल्या सोमवार प्रमाणेच श्रावणातल्या शनिवारी देखील अनेक जण उपवास करतात.
श्रावणातल्या शनिवारी शनिदेवांची उपासना केली जाते.
शनि हा कर्माची देवता आहे.
या महिन्यात शुद्ध मनाने उपवास करून शनि देवाची आराधना केल्यास त्याची कृपा लाभते, असं मानतात.
काही धार्मिक मान्यतानुसार, भगवान शिव हे शनिदेवांचे गुरू मानले जातात.
श्रावणात शनिवारी उपवास करून एकाच वेळी शिव आणि शनिदेवांची कृपा मिळते, असंही मानले जाते.