Published March 04, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - pinterest
देव तर चराचरात आहे असं म्हणताता मग घंटा का वाजवतात ?
याबाबत सविस्तर माहिती किस्सोंकी दुनिया या इंस्टाग्राम अकाउंटवरुन सांगितलं आहे.
असं म्हणतात की, देवळातली घंटा ही आपल्यासाठी लावलेली असते.
रोजच्या आयुष्यात आपल्याला अतिरिक्त ताण तणाव असतो.
यामुळे आपलं चित्त एकाग्र नसते. त्यामुळे मन स्थिर राहत नाही.
मन स्थिर नसेल तर देवपुजेमध्ये चित्त लागत नाही.
असं म्हटलं जातं की घंटेच्या आवाजाने आपले वाईट विचार दूर होतात.
घंटा वाजल्याने विचारात अडकलेलं मन मंदिराच्या गाभाऱ्यात येते.
स्ंकद पुराणानुसार घंटा नाद झाल्यावर ॐ असा ध्वनी निर्माण होतो.
त्यामुळे देवता प्रसन्न होतात. आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.