जेव्हा आपण दुःखी, त्रासलेले, आनंदी किंवा भावूक होतो, तेव्हा आपल्या मेंदूतील "लिंबिक सिस्टम" सक्रिय होते.
Picture Credit: Pinterest
लिंबिक सिस्टममधून "हायपोथॅलॅमस" नावाचा भाग अश्रू ग्रंथींना संदेश पाठवतो की डोळ्यातून पाणी सोडायचे आहेत.
Picture Credit: Pinterest
मेंदूचा सिग्नल मिळताच डोळ्यांच्या वरच्या भागातील अश्रू ग्रंथी कार्यरत होतात आणि ते पाणी निर्माण करतात.
Picture Credit: Pinterest
हे पाणी म्हणजे अश्रू, ते डोळ्यांत साचायला सुरुवात करतात. जेव्हा त्याची मात्रा वाढते, तेव्हा ते डोळ्यांतून वाहू लागतात.
Picture Credit: Pinterest
हे अश्रू फक्त पाणी नसतात, तर त्यात एन्झाईम्स, प्रोटीन आणि हार्मोन्स असतात, जे भावनात्मक तणाव कमी करतात.
Picture Credit: Pinterest
अश्रू वाहिल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि मनाला थोडा दिलासा मिळतो.
Picture Credit: Pinterest
अश्रू येणं ही मेंदू आणि शरीराची एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, जी भावना व्यक्त करणारी प्रक्रिया आहे.
Picture Credit: Pinterest