हिवाळ्यात सर्दी का होते ? 

Health

20 November 2025

Author: तृप्ती गायकवाड

थंडीच्या दिवसात सतत सर्दीचा त्रास हा हमखास होतोच. 

सर्दीचा त्रास

Picture Credit: Pinterest 

नाकातून पाणी येणं असो किंवा श्वास घ्यायला त्रास होणं थंडीत हे जाणवतंच.

नाकातून पाणी येणं 

कधी प्रश्न पडलाय का सर्दी खास करुन थंडीतच का होते.

 सर्दी 

थंड हवा, धूर, धूळ, परफ्यूम किंवा बदलती हवा यामुळे नाकातील नसांना त्रास होऊन शिंका येतात.

थंड हवेची अ‍ॅलर्जी

थंडीत हवा कोरडी असते. त्यामुळे नाकातील ओलावा कमी होतो. नाक सुकल्याने शिंका येतात.

कोरडी हवा

काहींना थंडीच्या दिवसात सतत नाकातून पाणी येतं.  

नाकातून पाणी 

थंड हवा नाकाला सतत लागल्याने नाक संवेदनशील होतं आणि सर्दी होते.

संवेदनशील

कोमट पाण्याची वाफ नाकातील सूज कमी करते आणि ओलावा टिकवून ठेवते.

सोपे उपाय

दोन्ही नाकपुड्यांमध्ये एक थेंब तूप किंवा तीळाचं तेल लावल्यानं कोरडेपणा कमी होतो.

 तूप किंवा तीळाचं तेल 

हायड्रेशन चांगलं ठेवलं तर रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि शिंका कमी होतात.

कोमट पाणी प्या