मनी प्लांट हे घरासाठी खूप शुभ मानले जाते. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात या रोपाला खूप महत्त्व आहे. हे रोप लावल्याने घरामध्ये संपत्ती वाढते
मनी प्लांट लावल्याने घराची सुंदरता वाढते. त्यासोबत घरामधील सकारात्मकता देखील वाढते. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
मनी प्लांट घरामध्ये लावल्याने सुख समृद्धी राहते. मनी प्लांटशी संबंधित काही उपाय वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.
वास्तुशास्त्रात म्हटल्यानुसार मनी प्लांटच्या मातीमध्ये दूध घातले पाहिजे त्याने काय होते ते जाणून घ्या
दूध हे शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. मनी प्लांटच्या मातीमध्ये दूध घातल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील वातावरण शुद्ध राहते.
मनी प्लांटच्या मातीमध्ये दूध घातल्याने उत्पन्नामध्ये वाढ होते. कर्जातून सुटका होते. कुटुंबामध्ये सकारात्मक वातावरण राहते.
मनी प्लांटच्या मातीमध्ये दूध घातल्याने शांती ग्रहाचे फायदे होतात. दरम्यान मनी प्लांट नेहमी योग्य दिशेला ठेवावे.