पावसाळ्यात डोक्याला सतत खाज का येते, जाणून घ्या

Lifestyle

07 August 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

जास्त दमटपणा आणि घाम

पावसाळ्यामध्ये हवेत ओलावा जास्त असतो त्यामुळे डोक्यात सतत घाम साचतो. हा घाम वाळत नसल्याने बॅक्टेरिया आणि फंगसची वाढ वेगाने होते.

Picture Credit: Pinterest

पावसाच्या पाण्यात भिजल्यास त्यातील रसायने,  ॲसिडिफिक घटक आणि घाण डोक्याच्या त्वचेवर जमा होते त्यामुळे खाज सुटते.

पावसाच्या पाण्यातील प्रदूषण

Picture Credit: Pinterest

डोक्यातील नैसर्गिक तेल आणि घाम एकत्र आल्याने ओलसर कोंडा तयार होतो जो त्वचेला चिकटून राहतो आणि खाज तयार करतो.

ओलसर कोंडा

Picture Credit: Pinterest

डोक्याला सतत खाज येत असल्यास त्यावर काही प्रभावी उपाय आहेत ते जाणून घ्या

यावरील प्रभावी उपाय

Picture Credit: Pinterest

पावसात भिजल्यास किंवा केस धुतल्यानंतर ते पूर्णपणे वाळवा. ओल्या बांधलेल्या केसांमुळे संसर्ग वेगाने पसरतो.

केस ओले ठेवू नका

Picture Credit: Pinterest

माईल्ड शॅम्पु

Picture Credit: Pinterest

आठवड्यातून दोन ते तीन वेळा सौम्य किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने  ॲटी फंगल शॅम्पुने केस धुवा

लिंबू आणि नारळ तेल 

Picture Credit: Pinterest

नारळाच्या तेलामध्ये थोडे लिंबाचा रस मिसळून डोक्याच्या त्वचेला लावल्यास फंगल संसर्ग आणि खाज कमी होते.

कडुलिंबाचे पाणी

Picture Credit: Pinterest

कडुलिंबाची पाने उकळून त्या पाण्याने केस धुतल्याने नसर्गिक अॅंटी बॅक्टेरियल संरक्षण मिळते.