तुम्ही तुमची बाईक चालवून पार्क करता, तेव्हा इंजिन बंद केल्यावर त्यातून टिकटिक असा आवाज येऊ लागतो. तो कशामुळे येतो माहिती आहे का?
Picture Credit: Pinterest
बाईक चालवून पार्क करता, तेव्हा इंजिन बंद केल्यावर त्यातून टिकटिक असा आवाज येऊ लागतो.
Picture Credit: Pinterest
बरेच लोक याला इंजिनची समस्या मानतात.
Picture Credit: Pinterest
पण, वास्तविक पाहता ही एक सामान्य वैज्ञानिक प्रक्रिया आहे.
Picture Credit: Pinterest
बाईक चालू असते तेव्हा तिचे इंजिन आणि सायलेन्सर खूप गरम होतात.
Picture Credit: Pinterest
ज्यामुळे धातूचे भाग थोडेसे प्रसरण पावतात.
\Picture Credit: Pinterest
इंजिन बंद केल्यावर जेव्हा हे भाग हळूहळू थंड होतात. तेव्हा ते आकुंचन पावून त्याच्या मूळ स्थितीत परत येऊ लागतात. ज्यामुळे हा आवाज येतो.
Picture Credit: Pinterest
आधुनिक बाईक्सच्या सायलेन्सरमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर बसवलेला असतो.ज्यामुळे प्रदूषण कमी होते.
Picture Credit: Pinterest
हा भाग अतिशय उच्च तापमानात काम करतो आणि थंड होत असताना येणारा बहुतेक टिक-टिक आवाज येथूनच येतो.
Picture Credit: Pinterest
हा आवाज पूर्णपणे सामान्य आहे आणि काळजी करण्याची गरज नाही. सहसा, गाडी पार्क केल्यानंतर ५ ते १० मिनिटांनी तो आपोआप थांबतो.
Picture Credit: Pinterest