तपत्या उन्हात शरीर जरा थंड रहावे म्हणून अनेक जण कोल्ड ड्रिंक पित असतात.
Picture Credit: Pinterest
मात्र, कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर शरीरात गॅस का निर्माण होते? चला याबद्दल जाणून घेऊयात.
कोल्ड ड्रिंकमध्ये कार्बन डायऑक्साइड मिसळलेला असतो; तो पोटात गेल्यावर बबल्स स्वरूपात वर येतो.
पोटातील उष्णतेमुळे कार्बन डायऑक्साइड आणखी फुगतो आणि गॅसचा दाब वाढतो.
पोट हा अतिरिक्त दबाव कमी करण्यासाठी गॅस बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो.
रिकाम्या पोटी कोल्ड ड्रिंक घेतल्यास गॅस बाहेर जाण्याची प्रक्रिया अधिक वेगाने वाढते.
ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि शरीराचा अतिरिक्त दाब कमी करण्याचा मार्ग आहे.