इंजिनची ताकद हॉर्स पॉवरमध्ये का मोजतात?

Automobile

11 August, 2025

Author:  मयूर नवले

बजेट फ्रेंडली कारसोबतच मार्केटमध्ये पावरफुल कारला सुद्धा चांगली मागणी आहे.

पावरफुल कार   

Img Source: Pexels

या पावरफुल कारमध्ये आपल्याला दमदार इंजिन पाहायला मिळते, ज्याची ताकद हॉर्स पॉवरमध्ये मोजली जाते. 

दमदार इंजिन

कारच्या इंजिनबद्दल बोलताना अनेकदा आपण हॉर्स पॉवर हा शब्द ऐकतो.

हॉर्स पॉवर

हॉर्स पॉवर म्हणजे काय?

हॉर्स पॉवर हे एक युनिट आहे. जे इंजिनची ताकद मोजण्यासाठी वापरले जाते.

जेम्स वॉट

हॉर्स पॉवर हे नाव स्कॉटलँडचे वैद्यानिक जेम्स वॉटने 18 व्या शतकात ठेवले . 

इंजिनची तुलना घोड्यासोबत

वॉट यांनी स्टीम इंजिन बनवले. त्यांनी इंजिनच्या ताकदीची तुलना घोड्यासोबत केली.

पूर्वीचा काळ

पूर्वीच्या काळी गाडी खेचण्याचे काम घोडे करत असत.

म्हणूनच घोड्यांसोबत तुलना

जेम्स वॉट यांना वाटले की जर इंजिनच्या ताकदीची तुलना घोड्यासोबत केली तर लोकांना ती नीट समजेल.