भारतीय ऑटोमोबाईल बाजारात EVs चा दबदबा का वाढत आहे?

Automobile

03 August, 2025

Author:  मयूर नवले

भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने  वाढ होत आहे.

इलेक्ट्रिक वाहन

Img Source: Pinterest 

चला EVs ची एवढी मागणी का वाढत आहे? याबदल जाणून घेऊयात.

यामागील कारण काय?

पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर लोकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्यास भाग पाडत आहेत.

इंधन दरवाढ

सरकारी अनुदान व सवलती

सरकारकडून EV खरेदीसाठी सबसिडी, कर सवलती, रोड टॅक्स माफी यासारख्या प्रोत्साहन योजना दिल्या जात आहे.

पर्यावरणीय जागरूकता

प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये आणि सरकारमध्ये हरित पर्यायांविषयी जागरूकता वाढली आहे.

चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ

शहरात चार्जिंग स्टेशनची संख्या वेगाने वाढत आहे, ज्यामुळे EV चा वापर सोपा झाला आहे.

कमी मेंटेनन्स खर्च

EV मध्ये इंजिन, गिअरबॉक्स यांसारखे कॉम्प्लेक्स भाग नसल्याने मेंटेनन्सचा खर्च खूपच कमी असतो.

कंपन्यांचे EVs कडे लक्ष

टाटा, महिंद्रा, ओला इलेक्ट्रिक यांसारख्या कंपन्या देशात EVs चे उत्पादन मोठ्या प्रमाणात करत आहेत.