लग्नानंतर मुलीने हातात हिरवा चुडा घालण्याची प्रथा फार जुनी आहे
Picture Credit: iStock
हिरव्या बांगड्या ही विवाहित स्त्रीची ओळख असते
हिरवा रंग हा निसर्ग, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे हिरव्या बांगड्या घालणे हे शुभ मानले जाते.
लग्नानंतर सासरच्या घरात नववधूचे स्वागत करताना तिला हिरव्या बांगड्या देणे ही एक पारंपरिक पद्धत आहे
काही प्रथा आणि लोकमान्यतेनुसार हिरव्या बांगड्यांचा कंपन स्त्रीच्या आरोग्यास चांगला असतो, विशेषतः मानसिक स्थैर्यासाठी
हिरव्या बांगड्या ही नवविवाहितेने आपल्यावर आलेल्या जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारल्याचा एक सांकेतिक भाग आहे.
काही लोकमान्यतेनुसार हिरव्या बांगड्या घातल्याने स्त्रीला मातृत्व लाभते अशी श्रद्धा आहे
आपल्या संस्कृतीतून चालत आलेल्या परंपरेचा एक भाग म्हणूनही बायका लग्नानंतर हिरव्या बांगड्या घालतात