Written By: Mayur Navle
Source: Yandex
काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडत आहे.
यानिमित्ताने अनेकांनी सोशल मिडियावर पाहिल्या पावसाचे व्हिडिओ शेअर केले आहे. पण पहिला पाऊस स्पेशल का असतो?
पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा सुगंध मन प्रसन्न करणारा असतो.
उन्हाळ्याच्या तीव्र गरमीनंतर थंडावा देणारा हा पाऊस शरीर आणि मन दोन्ही ताजे करतो.
पहिल्या पावसाशी अनेकांच्या प्रेमाच्या, बालपणाच्या किंवा कॉलेजच्या आठवणी जोडलेल्या असतात.
गाण्यांमध्ये, चित्रपटांमध्ये पहिला पाऊस नेहमी प्रेम आणि रोमँसचा प्रतीक म्हणून दाखवले जाते.
लहान मुलांसाठी चिखलात उड्या मारणे, कागदी होड्या सोडणे ही विशेष गंमत असते.
पहिला पाऊस कवी, लेखक यांच्या लेखनात नेहमीच प्रेरणादायी आणि प्रेमाचा विषय राहिलेला आहे.