Published Nov 19, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
ऑक्टोबरचा महिना संपल्यानंतर आता वातावरणात काहीसा गारवा जाणवू लागला आहे.
हळूहळू थंडी वाढत आहे. येत्या काही दिवसांतच राज्यात थंडीची लाट येऊ शकते.
हिवाळ्यामध्ये वातावरणामध्ये थंडीबरोबरच धुकं देखील पहायला मिळतं.
पहाटे धुकं खूप जास्त प्रमाणामध्ये असते. हिवाळ्यात एवढं धुकं का पडतं?
दिल्लीमध्ये सध्या धुक्याची चादर पसरली आहे.
हवेत असलेली पाण्याची वाफ पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतरित होते, तेव्हा धुकं तयार होतं.
हिवाळ्यात पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या उबदार हवेतली पाण्याची वाफ वर असलेल्या थंड हवेमध्ये मिसळून गोठते. याला द्रवीकरण म्हणतात.
जेव्हा हवेत जास्त द्रवीकरण होते, तेव्हा त्याचं रूपांतर पाण्याच्या लहान थेंबांमध्ये होतं. यालाच धुकं म्हणतात.
हवेचं तापमान आणि दवबिंदू यांच्यातला फरक हा 2.5 डिग्री सेल्सियसपेक्षा कमी झाल्यानंतर धुकं पडतं.
थंडीच्या दिवसांत हवेचं तापमान फार कमी असत त्यामुळे थंडीच्या दिवसात पसरतं.